Ad will apear here
Next
पुण्यात लवकरच धावणार २५ एसी इलेक्ट्रिक बस
इलेक्ट्रिक बसच्या निविदेस पालिकेत मंजूरी
पुणे : ‘पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा सर्वांत महत्त्वाचा भाग असलेल्या ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात २६ जानेवारी रोजी २५ एसी इलेक्ट्रिक बस समाविष्ट होणार आहेत. महापालिकेत २५ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसच्या निविदेस मंजूरी देण्यात आली आहे’,अशी माहिती पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी (दि.६) पत्रकार परिषदेत दिली. महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक या वेळी उपस्थित होते.

सिद्धार्थ शिरोळे
‘पुण्याच्या पेठांमध्येही सहज प्रवास करू शकतील अशा नऊ मीटरच्या २५ बस भाडेतत्त्वावर घेण्याचे कंत्राट देण्यात आले असून, या ३१ व्यक्तींची आसनक्षमता असलेल्या या बसेस येत्या २६ जानेवारीला पीएमपीएमएलच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. १२ मीटर लांबीच्या बसची निविदा प्रक्रियाही काहीच दिवसांत पूर्ण होईल’, असेही त्यांनी सांगितले. 

‘एसी इलेक्ट्रिक बसची सुविधा नागरिकांना नॉन एसी बसच्या दरातच उपलब्ध होणार आहे. या बससाठी भाडेतत्वावर प्रति किलोमीटर ४० रुपये ३२ पैसे असा दर देण्यात आला असून, दररोज या बसने २२५ किमीचा प्रवास करणे अपेक्षित आहे. या सर्व बस ‘बीआरटी कंप्लायंट' आहेत. ‘ओलेक्ट्रा ग्रीनटेक’ या कंपनीला हे कंत्राट मिळाले आहे. या बसचे चार्जिंग, तसेच देखभालीची जबाबदारी कंपनीची असेल. पालिका चार्जिंगसाठी वीज पुरवणार आहे. सुरुवातीला या लहान बस बीआरटी मार्गावरच धावणार असून, निगडी ते भेकराईनगर या मार्गावर ही बस धावेल. या बससाठी ४.५ रुपये प्रति किलोमीटर असा नाईट चार्जिंगचा खर्च येणार आहे, तर डे चार्जिंगचा खर्च ६ रुपये प्रति किमी आहे. हे विजेचे शुल्क पालिका भरणार आहे. सध्या सीएनजी नॉन एसी बससाठी प्रत्येक बसला ५४ रुपये ७ पैसे प्रति किमी खर्च येतो. त्यामुळे या बस तुलनेने स्वस्त व पर्यावरणपूरक आहेत. एप्रिलपर्यंत १२ मीटर लांबीच्या १२५ बस देखील पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार असून, त्या नंतरच्या ३५० बससाठी वेगळी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे’, असे शिरोळे यांनी सांगितले. 

‘सार्वजनिक वाहतूक सुविधा पर्यावरणपूरक आणि सामान्यांच्या सोयीची व्हावी, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृष्टीकोन आहे. त्याच्याशी सुसंगत असाच हा निर्णय आहे’, असेही शिरोळे यांनी नमूद केले.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZVUBV
Similar Posts
महिला प्रवाशांसाठी विशेष सहा बसेस दाखल पुणे : महाराष्ट्र सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत खास महिला प्रवाशांसाठी टाटा मोटर्स कंपनीने तयार केलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज सहा अल्ट्रा नाईन एम डिझेल मिडी बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. मार्च २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने आणखी २७ बसेस दाखल होणार आहेत
‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात हजार नवीन बसेस पुणे : ‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या १७ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत सार्वजनिक वाहतुकीसाठी नवीन बस घेण्याबरोबरच प्रवासीभाडे वाढीच्या प्रस्तावावरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार ऑगस्ट २०१९पर्यंत ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात एक हजार नवीन बसेस समाविष्ट होणार असून, प्रत्येक बस थांब्यावर नागरिकांना दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध होणार आहेत
सिद्धार्थ शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशे सफाई कामगारांचा सत्कार पुणे : पुणे महापालिकेच्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक चौदाला नुकतेच प्रथम स्थान मिळाले. या कामामध्ये प्रभागातील स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगारांचा मोठा वाटा आहे. या निमित्ताने व या प्रभागाचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या प्रभागाचे
‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये शिरोळे यांचे क्लीन बसेसवर सादरीकरण पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे नुकत्याच सिंगापूर येथे झालेल्या ‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये क्लीन बसेसबाबत महाराष्ट्राचे धोरण स्पष्ट केले. या परिषदेत ‘क्लीन बसेस इन सिटीज इन एशिया पॅसिफिक’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language